
बँकेने कर्ज नाकारले म्हणून उगीचच बँकेला दोष देवु नका . CIBIL SCORE काय असतो माहिती करून घ्या सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात.
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 2) दुसऱ्या कडून घेतलेली पैन पैपरत करतील ( Repayment Habit) या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा अजिबात संबंध नाही.
पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे, एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा, जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो इयुज सर्टीफिकेट . आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून Credit Information Bureau Ltd. या कंपनीची Aug 2000 मध्ये स्थापना झाली. आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे. ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका, वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे. समजा आपण बँकेत गेलो आणि कर्जासाठी अर्ज दिला तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या। आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते? तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते.
आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते? जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे है.

CIBIL स्कोर हा 300 ते 900 मध्ये मोजला जातो. जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल. पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करुन आणा ! कर्ज मिळतच नाही.
म्हणजे समजलं । कि बँका कर्ज देणे का नाकारतात? तर CIBILScore नीट नसती.
CIBIL Score कमी का होतो? 1) कर्जाचा EMI वेळेवर न भरणे.
2) कर्जाची परतफेडच न करणे.
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात.
बघा, मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतःहून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.याचा अर्थ असा कि, आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही.
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे. पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते. तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Store सुधारेल ? 1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका (ही तर सगळ्यात वाईट गोष्ट) 3) Home Loan , vehicle Loan , Education Loan, personal Loan कसंही लोन असू दया, त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत, ही शिस्त सांभाळा.
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली. समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला, तरी तो दुरुस्त करून घ्या. 5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे. तर सगळी जुनी कर्ज फेडून टाका! त्याच्या शिवाय पर्याय नाही.
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे. तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका, असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा. CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे म्हणजे, आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.या मध्ये NA – No Activity. NH – No History असे पर्याय दिसू शकतात. तर काय करा कि, एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा , अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल.
बँकींग सिस्टीम कशी काम करते? याबाबत आपल्या पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही आपण बँकांना, त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का देत नाहीस? म्हणून धारेवर धरतो, बँकेसमोर बँड वाजवतो, आंदोलनं करतो, धरणे देतो. पण राजे हो, कर्ज मिळण्या पाठीमागे एवढा सगळा पसारा असतो. इथे सबकुछ CIBIL असतं. त्याच्या बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही. म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज, बुडवू तर नकाच, परंतु वेळेत फेडा । नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही.

-Mr. Sagar Hase
SLH Tax & Financial Advisors
9921234133