
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जिथे भारतीय फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरत होते, तिथे सलामीवीर मयांक अगरवालने भारतीय संघाला सावरले. पण त्याचबरोबर मयांकने यावेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना मागे टाकत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गेल्या ३४ वर्षांमध्ये कोणत्याही खेळाडूला ही गोष्ट करता आली नव्हती.
हा सामना सुरु होण्यापूर्वी मयांकच्या डोक्यावर टांगती तलवार होती. कारण या सामन्यात त्याचा समावेश होणार की नाही, हे कोणालाही माहिती नव्हते. पण भारताच्या खेळाडूंची दुखापत मयांकच्या पथ्यावर पडली आणि त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मयांकने या संधीचे सोने करत एक नवीन विक्रम रचला आहे. मयांकने आजच्या दिवशी १४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद १२० धावांची दमदार खेळी साकारली. ही खेळी साकारताना मयांकने गावस्कर यांना मागे टाकले आहे. कारण न्यूझीलंडविरुद्ध वानखेडेच्या मैदानात गावस्कर यांनी १९७६ साली खेळवण्यात आलेल्या सामन्यात ११९ धावांची खेळी साकारली. या सामन्यात भारताने १६२ धावांनी विजय मिळवला होता.

पण त्यानंतर वानखेडेच्या मैदानात भारताच्या एकाही खेळाडूला गावस्करांपेक्षा न्यूझीलंडविरुद्ध खेळताना एवढ्या धावा करता आल्या नव्हत्या. पण मयांकने आजच्या पहिल्याच दिवशी नाबाद १२० धावा करत गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्धचा सर्वाधिक धावांचा विक्रम तब्बल ३४ वर्षांनी मयांकच्या नावावर झाला आहे. आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही फलंदाजांना एजाजने बाद केले आणि टीम इंडियाचे कंबरडे मोडले. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना तर त्याने एकही धाव करून दिली नाही. पण त्याचवेळी मयांक अगरवाल हा एकटा खेळपट्टीवर ठाम मांडून उभा राहीला आणि त्याने शतक झळकावल्यामुळेच भारताचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. मयांकच्या शतकाच्या जोरावर भारताला पहिल्या दिवशी ७० षटकांत ४ बाद २२१ अशी मजल मारता आली. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मयांक कशी फलंदाजी करतो आणि भारतीय संघ किती धावसंख्या उभारते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
- Novoline Spiele changing fate 40 Slot Free Spins Kostenlos Exklusive Anmeldung
- Bewertungen novoline Slot -Spiele Dahinter Euslot Casino
- Casinos Online Acimade https://vogueplay.com/br/buffalo-hold-and-win-booming/ Portugal Casino Portugal App
- Bovegas Casino Avis 2022
- Una Consejero Alrededor Huecos en magic love giros sin ranura los horarios De Pokerstars Wcoop 2022