अकोले (प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येथील अगस्ती कला , वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाला सलग तिसर्या वर्षी अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे यजमान पद दिले आहे. या महाविद्यालयाने
मागील दोन वर्षात जिल्ह्यात विभागीय क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. या बाबीचा विचार करून विद्यापीठाने पुन्हा एकदा ही जबाबदारी अगस्ती महाविद्यालयावर सोपवली आहे. मागील दोन वर्षात जिल्ह्यात स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करणारे महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यानाही विद्यापिठाणे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे याबाबतचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. अगस्ती महाविद्यालयाकडे शैक्षणिक वर्ष २०१९ – २० व २०२० – २१ या दोन वर्षाचे विभागीय क्रीडांचे यजमानपद विद्यापीठाने
अगस्ती महाविद्यालयाकडे दिले होते. विद्यापीठाचे एकूण चार विभाग आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर व नाशिक असे ते चार विभाग आहेत. दर वर्षी या चार विभागांमध्ये आंतरविभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. एकूण संलग्नित ११० महाविद्यालयांमध्ये
या स्पर्धा घेतल्या जातात. एकूण ५८ क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या विभागीय स्पर्धा या महिन्यापासून सुरु होत आहे. अगस्ती महाविद्यालयाने मागील दोन वर्षांचे उत्कृष्ट नियोजन केल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर
यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय स्पर्धांचे यजमानपद दिले जाते. अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांचे नेतृत्वाखाली मागील दोन वर्षी नगर जिल्ह्यात स्पर्धांचे उत्कृष्टपणे नियोजन करण्यात आल्यानेच पुन्हा एकदा हे यजमानपद अगस्ती महाविद्यालयाकडे देण्यात आले आहे.
उत्कृष्ट कामकाजाचे प्रमाणपत्र देऊन प्राचार्य शेळके यांना सन्मानित करण्यात आले आहे. विभागीय स्पर्धा समितीचे अध्यक्षपद प्राचार्य शेळके यांचेकडे असून सचिव म्हणून महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक डॉ. राहुल भोसले काम पहात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांचे मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. महाविद्यालयास सलग तिसर्या वर्षी हे यजमानपद मिळाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे
कार्यकारी विश्वस्त व माजी मंत्री मधुकरराव पिचड, कायम विश्वस्त सीताराम पाटील गायकर, कायम विश्वस्त वैभवराव पिचड, स्वीकृत विश्वस्त दशरथ सावंत, डॉ. बी.जी. बंगाळ, मीनानाथ पांडे, संस्थेचे अध्यक्ष जे.डी. आंबरे पाटील, उपाध्यक्ष मधुकर सोनावणे,
सेक्रेटरी यशवंत आभाळे, सह्सेक्रेटरी भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस.पी.देशमुख व सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राध्यापक , प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अबिनंदन केले आहे.