संगमनेर (प्रतिनिधी)
पाण्याच्या टाकीसाठी घेतलेल्या खड्ड्यात ढंपरणे माती टाकीत असतांना अचानक ढंपरचे फाळके निघून ढंपरमधील माती अंगावर पडून तालुक्यातील घुलेवाडी येथील एका तरूण कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास तालुक्यातील पिंपळे शिवारातील वटमाईच्या डोंगराजवळ असणार्या खडी क्रेशरजवळ घडली.
किरण मच्छिंद्र राऊत (वय.35) असे या अपघातात मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, किरण राऊत हे घुलेवाडी येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील तरूण नेतृत्तव होते.त्यांचा बांधकाम व्यावसाय होता. पिंपळे येथे एका पाण्याच्या टाकीचे काम सुरू असतांना त्यासाठी घेतलेल्या खड्ड्यात ढंपरमधून माती टाकली जात होती. या ढंपरचे फाळके किरण राऊत उघडीत असतांना अचानक ते सटकले आणि त्याचा जोराचा झटका राऊत यांना बसला आणि ते खड्ड्ात पडले. तर वरतून ढंपरमधील माती त्यांच्या अंगावर पडल्याने दबून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घुलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.